उपेग

Tuesday, May 2

देहिं ज्याच्या नाहि,
सात्विकाचे गुणं,
आगादा कामून,
करा बा?

कहाले बसावे,
मंदिराच्या दारीं,
कहाले ऊपाशी,
मरा बा?

कशापाई प्राणी,
करि आटापिटा,
कहाले जपाची माळ,
धरा बा?

मिका म्हणे ज्याला,
ऊपेग ना कशाचा,
तो आपल्या घरीच,
बरा बा!

– ही कविता माझा मित्र, रामेश्वर साबदे ने लिहिली आहे. वा बुआ!

येथे मी माझा वेळ वाया घलवणार आहे. बस्स.. सध्या तरी एवढेच. आणि हो!.. हे बरं आठवलं, ऐका …

चंदु म्हणे मेंदु,
पुरा वैतागला,
फुका शिणवला,
जन्मभर !

– इति सलील कुलकर्णी .. वा बुआ!!